विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर  : येत्या दोन दिवसात कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या जागा पाडणार याबाबत निर्णय घेऊ आणि जाहीर करू अशी घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे. राज्य सरकारला संधी दिली होती, मात्र त्यांनी संधीचा सोनं केलं नाही आता युद्ध अटळ असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझी निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती मात्र समाजाची इच्छा होती त्यामुळे त्यांचं मला ऐकावं लागतं. आता, लढणार , पाडणार , जिरवणार अशी घोषणाच जरांगे पाटील यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या जागा पाडणार याबाबत 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी  मोजक्या लोकांनी अर्ज भरावे जास्त लोकांनी अर्ज भरू नये अन्यथा परत घेताना गोंधळ होईल असं आवाहन केलं आहे.  आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण (Maharatha Reservation) जाहीर करण्याची संधी दिली होती मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं नाही आता युद्ध अटळ आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आमचा कुठलाही पक्ष टार्गेट नाही मात्र देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आरक्षण देऊ दिले नाही हे खरं आहे. एकनाथ शिंदे यांना याचं नुकसान होईल की नाही याबाबत दोन दिवसानंतर विचार करू असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.


मी मुस्लिम धर्मगुरूला भेटलो तर यांच्या पोटात का दुखलं, दलित मुस्लिम मराठ्यांना एकत्र येऊ न देणे हा यांचा डाव आहे यांनी मला पर्याय ठेवला नाही म्हणून आम्ही एकत्र आलो असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.


मराठा बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय
अंतरवाली सराटी इथं झालेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या सकल मराठा समाज बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार 


1. जी जागा जिंकून येऊ शकते अशा ठिकाणी  उमेदवार उभे करणार.


2. SC आणि  ST ठिकाणी जो आपल्याशी बांधील असेल त्यांना आपण लाखभर मतं /पाठिंबा द्यायचा.


3. जिथे आपण उमेदवार देणार नाहीत,तिथे जो बॉण्डवर लिहून देईल की आपल्याला आरक्षण देणार त्याला आपण साथ देऊ.


मनोज जरांगे यांची घोषणा
राज्यातील ज्या मतदार संघातून मराठा उमेदवार निवडून येऊ शकतो तिथे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून जातीची समिकरण उमेदवार निवडून येण्यासाठी जुळवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जिथे आम्हाला उमेदवार उभे करायचे नाहीत तिथे आमच्या विचाराशी साधर्म असलेल्या उमेदवाराने बाँड वर आमच्या मागण्याशी सहमत असल्याचे लिहून द्यावे,त्याला आम्ही मतदान करू असंही जरांगे यानी ठरवलं आहे. ज्यांनी मराठ्यांना संपवलं त्यांना संपवण्यासाठी लढावं लागेल  तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो,असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.