राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 18 उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे. मनसेची ही सातवी यादी आहे. विशेष म्हणजे एकीकडे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढत असलेल्या मुंबईतील महीम मतदारसंघात महायुतीबरोबर जुळवून घेण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंनी नव्या यादीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिला आहे.
महिमसाठी भाजपाचं समर्थन
समोर आलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी एका अशा व्यक्तीला तिकीट दिलं आहे जी भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक होती. मात्र भाजपाने या व्यक्तीला तिकीट नाकारल्याने आता मनसेने त्याच व्यक्तीला तिकीट देऊन महायुतीमधील उमेदवारासमोर उभं केलं आहे. राज ठाकरेंचा हा गनिमी कावा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे महीममध्ये अमित ठाकरेंच्या उमेदवारीचं समर्थन भाजपाने केलेलं असून शिंदेंच्या शिवसेनेच उमेदवार सदा सरवणकर यांनी मघार घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. यामध्ये भाजपाकडूनही अमित ठाकरेंना पाठिंबा दर्शवण्यात आला असला तरी सदा सरवणकर माघार घेण्यास तयार नाहीत. अशातच आता राज ठाकरेंनी यवतमाळमध्ये भाजपाचा टप्प्यात कार्यक्रम केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहेत.
कोणता उमेदवार केला जाहीर?
भाजपचे उमरखेडचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांना त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्याने आता त्यांना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमरखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज ठाकरेंची ही खेळी म्हणजे उमरखेडमध्ये भाजपाला धक्का दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांच्या नावांची सातवी यादी जाहीर केली. 18 उमेदवारांची नाव जाहीर झाली आहेत. राज ठाकरेंनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही यादी शेअर केली आहे.
मनसेच्या सातव्या यादीतील उमेदवारांची नावं खालीलप्रमाणे : -
बाळापुर - महेश गजानन गाडगे
मुर्तिजापूर - भिकाजी अवसर
वाशिम - गजानन निवृती वैरागडे
हिंगणघाट - सतिश चौधरी
उमरखेड - राजेंद्र नजरधने
औरंगाबाद - सुरेश दाशरथे
नांदगाव - अकबर सोनावाला
इगतपुरी - काशिनाथ मेंगाळ
डहाणू - विजय वाढिया
बोईसर - शैलेश भुतकडे
भिवंडी पूर्व - मनोज गुळवी
कर्जत खालापुर - जगन्नाथ पाटील
उरण सत्यवान भगत
इंदापुर - अमोल देवकाते
पुरंदर उमेश जगताप
श्रीरामपुर - राजु कापसे
पारनेर अविनाश पवार
खानापूर - राजेश जाधव