Baramati Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला वेग आहे. सर्वत्र जाहीर सभा, प्रचार सभा घेतल्या जात आहेत. अशामध्ये अजित पवारांनी आपल्या बारामती मतदार संघातील नागरिकांकरिता जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरनाम्यात अजित पवार आपल्या मतदार संघातील नागरिकांना 10 महत्त्वाच्या गोष्टी देणार आहेत. याची हमी यावेळी त्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार उभे आहेत तिथला जाहीरनामा वेगळा असेल. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने 50 जाहीरनामे सादर केले आहेत. सुनील तटकरे हे मुंबईतून राज्यव्यापी जाहीरनामा असलेली पुस्तिका प्रकाशित करत आहेत. प्रत्येक भागाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन आम्ही काम करत असल्याचं अजित पवार म्हणाले. 


शेतकरी कष्टकरी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या गरजांना या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे, ही माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. तसेच जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करत या जाहीरनाम्यातून केला आहे. आज बारामतीचा उमेदवार म्हणून हा जाहीरनामा सादर करत असल्याचा  मला अभिनान आहे.  गेल्या पाच वर्षात बारामतीला 9000 कोटीची विकास कामे केली. तसेच बारामतीत प्रगतीचा आलेख गाठणं हे गेल्या 33 वर्षापासूनच माझं धेय्य आहे. तसेच देशातील प्रगत तालुका बनवण्यासाठी मी कटीबध्द असल्याचं अजित पवार म्हणाले.  बारामतीत महाराष्ट्रातील पहिली जागतीक दर्जाची अकादमी उभा करणार असल्याचंही या जाहीरनाम्यात सांगितलं आहे. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 10 हमी


शेतकरी सन्मानार्थ योजनेतून 12000 वरून आता वर्षाला 15000 रुपये देण्याचा वादा 


शेतकऱ्यांची कर्जमाफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्याचा वादा 


वृद्ध पेन्शन आभारताना 1500 वरून आता महिन्याला 2100 देण्याचा वादा 


आवश्यक वस्तूंच्या किमतींवर आळा घालण्याचा वादा 


अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना महिन्याला 1500 रुपये देण्याचा वादा 


वीज बिलाब 30 टक्के कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा


कर्करोगावर उपचार करण्यासाठी बारामतीमध्ये रुग्णालय उभारणे 


बारामतीला भारतातील पहिलं सौर ऊर्जा शहर हनवण्याचा मानस. 


बारामतीत पहिली जागतिक दर्जाची क्रिडा अकादमी बनवण्याचा मानस. 


बारामतीत लॉजेस्टिक पार्क तयार करण्यात येणार आहेत.