महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. सर्वांना प्रतिक्षा लागलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. दरम्यान निवडणूक आयोगाची (Election Commission) पत्रकार परिषद होणार असल्याने महायुतीने आपली पत्रकार परिषद रद्द केली. दुसरीकडे आचारसंहिता लागणार असल्याने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला आहे. त्यात आजही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याच्या काही मिनिटं आधी एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांनी आणखी एक निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगची पत्रकार परिषद होण्याच्या काही मिनिटं आधी एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी कनिष्ठ पदांवरील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 29 हजारांच्या दिवाळी बोनसची घोषणा कऱण्यात आली आहे. ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत 3 हजार जास्त आहे. किंडरगार्टन शिक्षक आणि आशा सेविकांनाही बोनस मिळणार आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 29 हजार रुपये सानुग्रह अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलं आहे. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली - २०२४ प्रीत्यर्थ सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला. 



1. महानगरपालिका अधिकारी /  कर्मचारीः रुपये 29,000/-


2. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये 29,000/-


3. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये 29,000/-


5. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-


6. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-


7. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-


8. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये 29,000/-


9. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये 12,000/- 


10. बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये 5.000/-