आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुतीमध्ये (Mahyuti) अद्याप जागावापटबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जागावाटपावरुन चर्चा सुरु असून ती अंतिम टप्प्यात आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शइंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे आपला एक मतदारसंघ सोडण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी शिवसेना भांडूप मतदारसंघ सोडायला तयार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.  अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना जागा सोडायला तयार आहे. जर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर शिवसेना त्यांच्यासाठी जागा सोडणार आहे. अमित ठाकरेंसाठी शिवसेना भांडूप मतदारसंघ सोडू शकतो. उमेदवारी दिली तर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजून अमित ठाकरे यांची उमेदवारी बद्दल निर्णय घेतलेला नाही.


अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?


लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौराही सुरु केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने राज्यभर उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता अमित ठाकरेही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.


अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. अमित ठाकरे भांडुप विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंकडे केल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीय. मात्र यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. भांडुप विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी सर्वांत सुरक्षित असल्याचा अहवाल मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे दिल्याचं कळतंय..