लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...
Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा (Laadki Bahin Yojna) डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली.
Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा (Laadki Bahin Yojna) डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली. तसंच विरोधक सत्तेत आले तर ही योजना बंद करतील असा दावाही केला.
हेदेखील वाचा - मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! 'या' मतदारसंघांमधून निवडणूक लढणार; वाचा संपूर्ण यादी
"लाडकी बहीणला पैसे देणारे गुन्हेगार असल्याचं म्हणत आहेत. असं असेल तर हा गुन्हा मी 10 वेळा करण्यास तयार आहे. मतं घेतल्यानंतर नंतर तुम्ही माघार घेता, पण एकनाथ शिंदे असं करणार नाही. जे बोलणार ते करणार. राजस्थान, हिमाचल प्रदेशमध्ये यांनी लोकांची फसवणूक केली. कर्जमुक्ती करेन सांगितलं आणि विसरले. तिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. चुकून छापलं गेलं असं ते म्हणाले. पण आम्ही असं करणार नाही. कारण बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची शिकवण आहे. आम्ही लोकांना फसवणार नाही," असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
"आम्ही लोकांमधे जाऊन काम करणारे लोक आहोत. घरी बसून फेसबुक लाईव्ह नव्हे तर फेस टु फेस काम करणारे आहोत. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 देऊन थांबणार नाही. हे पैसे आम्ही वाढवणार आहोत. आता आचारसंहिता लागली आहे. विरोधकांना वाटलं की नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाहीत, त्याच्या आधारे सरकारविरोधात बोंब मारण्यची संधी मिळेल. पण आम्हाल विरोधी चालाख आहेत याची माहिती होती. आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. यामुळे त्यांची बोलती बंद झाली," असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
'लोकसभेत साहेबाला खुश केलं, आता मला खुश करा', अजित पवारांची बारामतीकरांना साद
20 तारखेला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, "आम्हाला लाडक्या बहिणीला सुरक्षित करायचं आहे. लाडकी आणि सुरक्षित बहिण देण्याचं काम आमचं आहे. 1500, 2000 नाही तर लाडक्या बहिणीला राज्यात लखपती होताना आम्हाला पाहायचं आहे. हे डबल इंजिन सरकार सर्वसामान्यांचं आहे. आम्ही देणारे लोक आहोत. आम्ही नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्स दिले, कारण आमचं अॅडव्हान्स देणारं हे सरकार आहे. पाच हफ्ते सगळ्यांच्या खात्यात आले. आम्ही हफ्ते भरणारे असून, मागचं सरकार हफ्ते वसूल कऱणारं होतं. हाच फऱक असून आम्ह देना आणि ते लेना बँक आहेत. म्हणून 2 वर्षांत इतकं काम केलं आहे".