Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर  त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट उपाधी काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून त्यांनी ते काढून टाकलं अशी टीका राज ठाकरेंनी केलं. तसंच  आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"घाटकोपरची सभा आटपून येथे आले. इतका ट्रॅफिक जाम झाला की तीन तास लागतील की काय असं वाटलं. मला समजत नव्हतं की वेळेवर पोहोचेन की नाही.  विचका झाला आहे संपूर्ण शहराचा दुसरा शब्द नाही त्याला. कोणाचंही लक्ष नाही. शहरात नुसती माणसं येत आहेत आणि भरलं जात आहे," असा संताप त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला व्यक्त केला. 


पुढे ते म्हणाले, " गेली अनेक वर्षं हा वरळी कोळीवाडा पाहत आहे. छान टुमदार होतं, पण आता आजुबाजूला सगळं वाढलं आहे. इथल्या कोळी बांधवांचे, वरळीकरांचे घराचे प्रश्न आहेत.  प्रत्येक बिल्डरचं लक्ष आहे. ब्रीजववरुन येता-जाता पाहत असताता. इथेच आमचा वरळीचा किल्ला आहे, जो ब्रिटिशांनी 1675 साली म्हणजे महाराज असताना बांधला होता. समुद्रमार्गे शत्रू आला तर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता.  तसाच माहीमचा बांधला होता. माझी इथल्या कोळीवाड्यातील बांधवांना विनंती आहे मी तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाही तर जमिनीवरून येणार आहे. तिथे तुमचं लक्ष असंल पाहिजे".


पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव...'


 


"हा देव सर्वांचा आहे मान्य आहे. पण कोणीही कुठे कधीही जाऊ शकतो हे मला मान्य नाही.  कारण या देशाचा कायदा आहे. जर तुम्हाला एखाद्या देशातून एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तिथल्या पोलिसांना सांगावं लागतं. सगळे कायदे धाब्यावर बसवून कोणीही कुठे जाते आणि काहीही करतं. मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे. या राज्याची संपूर्ण सत्ता माझ्या हातात दिली तर मुंबई साफ करण्यासाठी पोलिसांना 48 तास देईन," असं राज ठाकरे म्हणाले. 


"पण हे काही करत नाहीत कारण एखादी मोठी गोष्ट झाली तर बळी यांचाच जाईल.  योग्य भूमिका घेत होते म्हणून निलंबित केलं जाईल. कोणी यांच्या मागे उभे राहत नाही. मागे एकदा रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता. सगळे मुसलमान आझाद मैदानात आले होते. चॅनलवाल्यांचे उभी व्हॅन फोडून टाकल्या, कॅमेरामनला मारले. आमच्या पोलिसांवर हात टाकले. भगिनी पोलिसांवर सुद्धा हात टाकले. त्या मोर्चाच्या विरोधात कोणीही उठला नाही फक्त राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मोर्चा काढला. त्यावेळेस पोलीस आयुक्त येऊन सांगत होते  तिथे काही करतील पण तुम्ही हात नाही उचलायचा. मग हातामध्ये दांडके दिली कशाला गरबा खेळायला? अशा नीच प्रवृत्ती महाराष्ट्रात आहेत. अनेक मोहल्ल्यात  लपल्या आहेत. माझ्या हातात सत्ता दिली तर सडकवून काढेन," असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. 



"मुस्लिम मौलवी आज फतवे काढत आहेत.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्टत नाही.  2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या अब्रू बाजूला ठेवल्या. एके दिवशी सकाळी सहा वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. अर्धा तास लग्न टिकलं आणि घटस्फोट झाला.  घटस्फोट झाल्या झाल्या उद्धव ठाकरे यांनी बघितलं आपल्याला कोण कोण डोळा मारत आहे.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केलं.  किंवा शिवसेना भाजप नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला काही लोकांनी मतदान केलं. पण  भाजप आणि राष्ट्रवादी यांचा शपथविधी आधी होतो. मग त्यातली एक उठते आणि उरलेल्या दोघांबरोबर संसार करायला लागते. जनाची नाही कशाशी लाज नाही," अशी टीका राज ठाकरेंनी केली. 


"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अडीच वर्ष बघा. त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट काढून टाकलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल, मुस्लिम मतं जातील म्हणून त्यांनी ते काढून टाकलं. काही होर्डिंगवरती हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी जनाब लिहिलं होतं. आज ते हयात असायला हवे होते, फोडून काढले असते एकेकाला. आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात. फतवा काढतात की सगळ्या मुस्लिमांनी एकत्र यावं आपली मतं फुटू नये. आणि सगळी मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी असं फर्मान काढत आहेत,  याचे व्हिडिओ काढत आहेत आणि पाठवत आहेत," असा दावा राज ठाकरेंनी केला. 


मुल्ला मौलवी फतवा काढत असतील तर आज राज ठाकरे फतवा काढतोय. जिथे माझे उमेदवार असतील तिथे माझ्या पाठीशी उभे राहा. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर परत तर राज ठाकरे नाव सांगणार नाही. जर अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर खाकीवाल्यांना ऑर्डर देईन. ते रझा अकादमीचा बदला घेतील," असा इशाराही राज ठाकरेंनी दिा.