Sharad Pawar on Ajit Pawar: आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांच्या हातात सगळं काम दिलं, त्यांनी एक दिवसच पक्षच घेऊन टाकला आणि दुसरीकडे जाऊन बसले अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त कलेी. शरद पवारांनी यावेळी अजित पवारांची रडतानाची नक्कलही केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीतून अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आता कोण चुकलं? पहिला फॉर्म मी भरणार होतो असं म्हणत अजित पवारांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. आई नाही म्हणत असताना घरात एकोपा राहिला पाहिजे, आमचं घर कुणी फोडलं? असा भावनिक सवालही अजित पवारांनी यावेळी बारामतीकरांना केला.


यावर शरद पवार व्यक्त झाले असून जाहीर सभेत भाषण करताना म्हणाले, "ज्यांच्या हातात सगळं काम दिलं, त्यांनी एक दिवसच पक्षच घेऊन टाकला आणि दुसरीकडे जाऊन बसले. तिकडे पद मिळालं हे मान्य आहे. पण त्याआधी 4 वेळेल ते पद मिळालंच होतं. 4 वेळा तुम्हाला पद मिळालं, एखाद्या वेळी नाही मिळालं तर घड मोडायचं नसतं. मी घर फोडलं असं बोलले आहेत. फार गमतीची गोष्ट आहे. घर फोडायचं काय कारण? कुटुंबातील वडीलधारा मी आहे. आजपर्यंत माझं ऐकतही होते. मी त्यांच्या मनाच्या विरोधात काही करत नव्हतो आणि करणारही नाही. येथून पुढे कोणीही चुकीची भूमिका घेतली तरी मी चुकीच्या रस्त्याने जाणार नाही. कुटुंब एक राहील याची मी काळजी घेईन. हा माझा स्वभाव आहे". 


'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'


 


"पक्ष मी स्थापन केला आणि एके दिवशी काही लोकांनी आमच्यावर खटला केला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं.  सुनावणी झाली. एक नंबरचं समन्स शरद गोविंदरावर पवार होतं. समन्स आल्यावर हजर राहावं लागतं. मी कधी समन्स पाहिला नव्हता. कोर्टात हेवो, तिथे उभा राहिलो. माझ्याविरोधात चिरंजीवांची तक्रार होती. माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं. ती केस करुन मला कोर्टात खेचलं गेलं. केंद्र सरकार त्यांच्या हातात होतं. तिथे काय चक्रं फिरली माहिती नाही. पक्ष आणि चिन्ह त्यांचं आहे आणि शरद पवारांचा काही संबंध नाही असं सांगण्यात आलं," असं शरद पवार म्हणाले. 


अजित पवारांची केली नक्कल


"सुप्रिया सुळे निवडणुकीला उभ्या असताना समोर सुमित्रा होत्या. साहेत येतील, भावनांना घात हालतील अशी भाषण केली होती. पण तुम्ही भावनाप्रधान होऊ नका असं आवाहन मतदारांना करण्यात आलं होतं. साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि मत द्या  सांगतील तेव्ह तुम्ही भावनाप्रधान होऊ नका असा सल्ला दिला," याची आठवण शरद पवारांनी करुन दिली. यानंतर त्यांनी खिशातून रुमाल काढून डोळे पुसत अजित पवार रडतानाची नक्कल केली.