Sanjay Raut on Traders: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यापारी भेसळखोर असल्याचा आरोप केला आहे. यावरुन मोठा वाद पेटला आहे. संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका करताना थेट व्यापाऱ्यांचा अपमान केल्याचं बोललं जात आहे. व्यापारी खोटं बोलतात असंही संजय राऊत म्हणाले असून त्यावरुन आता टीकेची झोड उठली आहे. 


संजय राऊत काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अमित शाह खोटं बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलत असतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो. तो ग्राहकाला फसवतो," असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, "370 कलमाला कोणीही विरोध केलेला नाही. काही भूमिका मांडल्या असतील. 370 कलमाला शिवसेनेने विरोध केला नसून, उलट पाठिंबा दिला आहे. 370 कलम हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले?".


"महाराष्ट्रातील 1 कोटी व्यापाऱ्यांच्या वतीने मी त्यांच्या बेजबाबदार विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांनी नुसतं भेसळ करतात नाही तर खोटं बोलतात असंही म्हटलं आहे. आता कोण रोज काय खोटं बोलतात यात आम्हाला जायचं नाही. पण या देशाची, राज्याच्या अर्थव्यवस्था व्यापाऱ्यांच्या योगदानावर चालत असते. नुसतं करच नाही तर सर्वाधिक रोजगार देण्याचं कामही व्यापारी करतात. अशात त्यांना भेसळखोर म्हणणं, खोटारडे, फसवणारं म्हणणं....तुम्ही आम्हाला काय शिकवत आहात? तुम्ही जबाबदार राजकारणी असून, जबाबदारीने बोललं पाहिजे. तुम्ही राजकारणावर बोला आणि व्यापाऱ्यांवर बोलण्याच्या भानगडीत पडू नका. प्रत्येक क्षेत्रात 1-2 टक्के चुकीचे लोक असतात, त्याप्रमाणे काही व्यापारी असतील. यासाठी कायदा असून, सरकार कारवाई करत असतं. तुम्ही सरसकट असं व्यापाऱ्यांना बोलणं योग्य नसून, मी निषेध करतो," असं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलं आहे. 


"लाखो मराठी तरुण आज व्यापार करत आहेत. कर्ज काढून व्यापार, उद्योग करत आहेत. त्यांना तुम्ही भेसळखोर, खोटारडे बोलणार आहात. ते मेहनत करुन कुटुंब चालवत असतात. त्यांना असं बोलणं योग्य नाही. कोण काय व्यापार करतं आणि तुम्ही कसे पैसे मिळवता या विषयावर आम्ही कधी जात नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला न लागलेलं बरं," असा इशारीही यावेळी त्यांनी दिला.