शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, `आम्ही त्यांना टेबलावर...`
Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती.
Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बंडात सहभागी झाल्याने पालघरमधून (Palghar) आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती. पण पालघरचे श्रीनिवास वनगा (Srivinas Vanga) यांना मात्र नशिबाने साथ दिलेली नाही. श्रीनिवास वनगा बंडात सहभागी होऊनही उमेदवारी न मिळालेले एकमेव उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या जागी राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना संधी देण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "हे आमदार एकनाथ शिंदेमुळे नाही तर उद्धव ठाकरेंमुळे झाले. पण हे महायश सूरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. आम्ही टेबलावर त्यांना नाचताना पाहिलं. तेव्हा त्या भागातील अनके शिवसैनिकांना रडू कोसळलं होतं. याला आम्ही निवडून दिलं आणि आज अशा प्रकारे तांडव करत आहे. आता ही कर्माची फळं असतात, आणि ती अनेकांना भोगावी लागतात. एकनाथ शिंदेंनहाी ही कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेंनाही रडू कोसळेल".
'उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं'; 'या' आमदाराने सोडलं अन्न पाणी; म्हणतो 'मी आयुष्य...'
त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत का? असं विचारलं असता या प्रश्नाला अर्थ नाही. पश्चाताप झाला असेल तर घरी बसा असं ते म्हणाले.
"शेतकरी कामगार पक्ष आमचा मित्रपक्ष आहे. यासाठी आमच्या शिवसेनेच्या कोट्यातील रायगडमधील किमान दोन जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत. काँग्रेस आणि आमच्यात काही टोकाचे मतभेद नाहीत. आघाडीत किंवा कोणत्याही युतीत एखाद्या जागेवरुन शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरु असते. म्हणजे त्यावरुन बिनसलं असं नाही. नाना गावंडे यांच्याशी चर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय मिटवला आहे असं त्यांनी सांगतलं. इतर ठिकाणीही आम्ही समन्वयाने भूमिका घेणार आहोत," असं संजय राऊतांनी सांगितलं.
शिंदेच्या शिवसेनेत पहिलं बंड होणार? गुवाहाटीला जाऊनही तिकीट नाकारलं; 'हा' नेता घर सोडून गेला, जाण्याआधी म्हणाला...
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, "हा त्या दोन पक्षांचा प्रश्न आहे. मनसे आणि सदा सरवणकरांचा पक्ष हे एकाच आघाडीतील पक्ष आहेत. आम्ही वेगळे लढत आहोत असं ते दाखवत आहेतत. त्या दोन पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या पक्षात चर्चा होईल तेव्हा त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल".
पुढे ते म्हणाले की, "दादर-माहीम मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा जॉर्ड फर्नांडिस निवडणूक लढवत नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात. अनेक नेत्यांची मुंलं निवडणूक लढत आहेत. राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला निवडणूक लढावी लागते. मग माझे वडील, आई, आजोबा कोण आहेत याचा विचार न करत निवडणूक लढायची असते. तुम्ही याचा फार बाऊ करु नका. हे राज्य फार मोठं आहे, आमच्या पक्षातील निर्णय उद्धव ठाकरे घेतील".