Who is Ravi Raja: काँग्रेसचे दिग्गज नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत रवी राजा यांचा पक्षप्रवेश पार पडला. रवी राजा गेल्या 44 वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. पक्षाने माझ्या अनुभवाचा कधीच वापर करून घेतला नाही अशी खंत त्यांनी पक्ष प्रवेशादरम्यान मांडली. पण रवी राजा नेमके कोण आहेत हे जाणून घ्या. 


कोण आहेत रवी राजा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी राजा हे सायनमधून पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. तर मागील पाच वर्षं मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेतेही होते. गेली 44 वर्षं ते काँग्रेसमध्ये होते. मुंबई काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक पदं भुषवली. मुंबई महापालिकेच्या राजकारणात अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सायन परिसरात दक्षिण भारतीय समाजात त्यांची चांगली ताकद आगे. मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड वारंवार डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


रवी राजांनी पत्रकार परिषदेत म्हटलं भावी मुख्यमंत्री, उल्लेख ऐकताच फडणवीस म्हणाले 'आधी...', पिकला एकच हशा


 


रवी राजा यांच्यासह उपाध्यक्ष अभिषेक सावंत, ठाकरे गटाचे घाटकोपरचे विभाग प्रमुख बाबू दरेकर यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांना उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे.  रवी राजा यांची मुंबई उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रवी राजा हे आमचे जुने मित्र आहेत. रवी राजा हे अभ्यासू नेतृत्व आहे. बीएसटीच्या बाबतीत तर यांचा अभ्यास दांडगा आहे असं आशिष शेलार यावेळी म्हणाले. 


आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता आमच्यासोबत आला. 23 वर्ष त्यांनी बेस्टचे सदस्य म्हणून काम केलं. रवी राजा यांचा अनुभवाचा आम्हाला फायदा होईल असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. पुन्हा महायुतीचं सरकार येणार अशी भावना आता जनतेच्या मनात आहे. क्रॉस फॉर्म अनेक ठिकाणी भरण्यात आले आहेत.  त्याबाबत काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास सगळ्या समस्या सोडवल्या आहेत. जे अर्ज मागे घ्यायचे आहेत ते आम्ही लवकरच मागे घेऊ. दिवाळीनंतर आम्ही जोरात प्रचार करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 


राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. अमित ठाकरेंबद्दल विचारलं असता त्यांनी बोलणी सुरू आहे, मार्ग असा निघावा की आम्ही सगळे सोबत एकत्र राहू असं सांगितलं. नवाब मलिक यांच्याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका आशिष शेलार यांनी मांडली आह. त्यांची भूमिका अधिकृत आहे असंही मी सांगितलं आहे.. त्यामुळे त्यावर वारंवार चर्चा करणं योग्य नाही असं फडणवीस म्हणाले. आता आर आर पाटील हयात नाही सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.