Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होत आहे. एकेकाळी मित्र पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना UBT आता कट्टर राजकीय विरोधक झालेत. 2019मध्ये  जनतेनं युतीच्या बाजूनं कौल दिला असतानाही उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी धोका दिल्याचं सांगत, अमित शाह यांनी थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. तर उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत राहुल गांधींना दोन चांगले शब्द बोलायला सांगावं, असं आव्हान शाहांनी उद्धव यांना दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामजन्मभूमी आणि कलम 370 हटवण्याला विरोध करणा-यांसोबत उद्धव ठाकरे बसलेत,असा हल्लाबोलही शाहांनी केलाय. तसंच CAA, UCCला विरोध करणा-यांना उद्धव साथ देत असल्याची टीकाही त्यांनी केली.  काँग्रेसचा सावरकरांना विरोध असल्यानं अमित शाहांनी याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना टार्गेट करत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. तर बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक करण्याचं धाडस काँग्रेसमध्ये आहे का? असा सवाल मोदींनीही नुकताच प्रचार सभेत केला होता. एकूणच या निवडणुकीत मोदी-शाहा थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट करत असल्यानं, आता उद्धव ठाकरे त्यांना कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


शरद पवारांनी सुप्रीया सुळेंऐवजी अजित पवारांना नेता केलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसता.. तसंच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना संधी दिली असती तर शिवसेना फुटली नसती अशी प्रतिक्रीया अमित शाह यांनी दिलीये.. मुंबईत अमित शाह यांच्या हस्ते भाजपच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतत्यांनी घराणेशाहीवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.