Maharashtra Assembly Elections 2024 :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. जवळपास सर्वच महत्वाच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात आणखी एका नविन पक्षाची स्थापना झाली आहे.  'शिवाजी द मॅनेजमेंट गुरु' पुस्तकाच्या लेखकाने स्वतःचा पक्ष  काढत   महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादग्रस्त लेखक नामदेव जाधव यांनी स्वतःचा पक्ष काढला आहे.  कुणाला विधानसभा निवडणूक लढवायची असेल आणि कोणताच पक्ष उमेदवारी देत नसेल तर अशांसाठी हा पक्ष एक पर्याय असेल. नामदेव जाधव हे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या लेखकाचे लेखक आहेत.


नामदेव जाधवन यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी बारामतीतून लढले होते. नामदेव जाधव यांनी आता स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. छत्रपती शासन अस या पक्षाच नाव आहे.  मागेल त्याला उमेदवारी असं धोरण त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घोषित केले आहे. नामदेव जाधव स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे वंशज म्हणवतात. त्यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर शाईफेक देखील झाली होती.  आणखी महत्त्वाचं म्हणजे या नामदेव जाधव यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. तर तेच नामदेव जाधव स्वतःचा पक्ष घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पुण्यात लेखक नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आल होते.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शऱद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं. नामदेव जाधव यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या निषेधार्थ जाधवांना काळं फासण्यात आलं होते. दरमन्यान, मालेगाव शहराचे माजी आमदार आसिफ शेख यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र म्हणजेच  इस्लाम पक्षाची स्थापना केलीय. विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात इस्लाम पक्ष उतरणार आहे.