महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढणार आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील सर्वात हायप्रोफाईल मतदारसं असलेल्या वरळी मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. वरळी विधानसभेसाठी मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. मिलिंद देवरांसह इतर नेत्यांच्या नावावरही चर्चा सुरू होती. अखरे मिलिंद देवरा नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. देवरांना उमेदवारी मिळाल्याने वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा असा सामना रंगणार आहे.
वरळी विधानसभा मतदार संघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. वरळीत तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वरळीत आता हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. वरळीत शिवसेना UBTकडून आदित्य ठाकरे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे अशी लढत होणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. याच वरळी मतदार संघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडें हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजप नेत्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.