मुंबई  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्यानंतर आता उमेदवारांच्या संपत्तीबाबत चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करत संपत्तीची माहिती दिलीये. यामध्ये गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये कोट्यवधी रुपयांनी वाढ झालेल्यांमध्ये सर्वाधिक महायुतीचे उमेदवार असल्याचं समोर आलं आहे. या नेत्यांच्या संपत्तीचा चढता आलेख प्रियंका चतुर्वेदींनी ट्वीट केला आहे. 


धनवान उमेदवारांची संख्या वाढली : 


गीता जैन (अपक्ष आमदार)
2019 - 70.44 कोटी
2024 - 392.30 कोटी


पराग शहा (भाजप)
2019 - 500.62 कोटी
2024 - 3383.06 कोटी


राहुल नार्वेकर (भाजप)
2019 - 38.09 कोटी
2024 - 129.81 कोटी


हेही वाचा : बारामतीकरांचं काय ठरलंय? अजित पवारांच्या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा


 


प्रताप सरनाईक (शिवसेना)
2019 - 143.97 कोटी
2024 - 333.32 कोटी


तानाजी सावंत (शिवसेना)
2019 - 194.5 कोटी
2024 - 218.1 कोटी


दीपक केसरकर (शिवसेना)
2019 - 59.70 कोटी
2024 - 98.50 कोटी


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी महायुतीच्या नेत्यांच्या संपत्तीची हिशोब मांडत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत उमेदवारांच्या संपत्तीत झालेल्या वाढीची जोरदार चर्चा सुरू झालीये. प्रियंका चतुर्वेदींनी मांडलेल्या संपत्तीच्या चढत्या आलेखावरून जोरदार राजकारण तापण्याची शक्यता आहे.