Maharashtra Assembly Elections : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये दणक्यात विजय साजरा करणारे राहुल गांधी सध्या संपूर्ण लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत करताना दिसत आहेत. राज्यातील एकंदर चित्र पाहता संपूर्ण देशाचच लक्ष या निवडणुकीकडे लागल्यामुळं मोठे नेतेही इथं अपवाद नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या याच वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा मविआसाठी फारशी हितकारक नाही. कारण, ही चर्चा आहे राहुल गांधी यांना न भावलेल्या एका निर्णयाची. राज्यातील निवडणुकीच्या धर्तीवर ज्या प्राधान्यक्रमानं ठराविक चेहऱ्यांनात पसंती देत उमेदवारयादीत स्थान देण्यात येणं, ही बाब राहुल गांधी यांना रुचलेली नाही. सूत्रांचा हवाला देत इंडिया टुडेनं यासंदर्भातीव वृत्त जाहीर केलं. 


विधानसभा निवडणुकीसाठी पात्र उमेदवारयादीसंदर्भात दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतरच याबाबतचं वृत्त समोर आलं. आतापर्यंत काँग्रेसनं 90 पैकी 48 नावं जाहीर केली. काँग्रेसच्यावतीनं Congress Election Committee (CEC) कडे जी नावं उमेदवार यादीसाठी पुढे करण्यात आली होती, त्यावरून राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या यादीमध्ये असणाऱी अनेक नावं काँग्रेस नेत्यांच्या मर्जीतील असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला होता. शिवाय त्यांनी विदर्भ आणि मुंबईसारख्या मतदारसंघांमध्येही आपल्या उमेदवारांसाठी जागावाटपात प्राधान्य न दिसल्यानं नाराजी व्यक्त केली. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक 


प्राथमिक माहितीनुसार काँग्रेसला महाराष्ट्रात 100 जागा लढवायच्या होत्या. पण, आता मात्र हे समीकरण प्रत्येक पक्षाच्या 90 जागा इतक्यावर येऊन थांबल्यामुळं आता त्यांच्या नाराजीत भर पडण्यास आणखी एक कारण मिळालं आहे. तेव्हा आता राहुल गांधी ही नाराजी जाहीरपणे व्यक्त करणार की, त्यावर मविआतून तोडगा निघणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.