Maharashtra Assembly Elections 2024 :   महायुतीसाठी नवाब मलिक आणि सना मलिकांची उमेदवारी अवघड जागेचं दुखणं झालंय. अजित पवारांनी नबाव मलिकांना मानखुर्दमधून तर सना मलिकांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिलीय. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतानाही या दोन्ही मतदारसंघात शिवसेननं उमेदवार दिलेत... मुख्य म्हणजे दोन्ही उमेदवारांची मलिकांना टक्कर देतील एवढी ताकदही नाही... त्यामुळं महायुती मलिकांच्या विरोधाचं नाटक करते का असा संशय निर्माण झालाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक आणि सना मलिक महायुतीला नकोसे आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. दोघाही बापलेकीला राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीय. तरीही महायुतीचे नेते त्यांना स्वीकारण्यास तयार नाही. शिवाजीनगर मानखुर्द आणि अणुशक्तिनगर या दोन्हीही मतदारसंघात महायुतीनं उमेदवार दिलेत.


अणुशक्तिनगरमध्ये राष्ट्रवादीनं सना मलिक यांना उमेदवारी दिलीय. तरीही तिथं शिवसेनेनं अविनाश राणे यांना उमेदवारी दिलीय. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. तिथं शिवसेनेनं सुरेश पाटील यांना उमेदवारी दिलीय. कोणत्याही पक्षाच्या आणि नेत्याच्या भरवशावर निवडणूक लढवत नसून जनतेच्या भरवशावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं नवाब मलिकांनी सांगितलंय.सना मलिक यांनी महायुती आमच्या सोबत नसली तरी अजितदादा आमच्या सोबत असल्याचं सांगितलंय.  सना मलिक आणि नवाब मलिक यांच्याविरोधात महायुतीनं उमेदवार दिलेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी काही ठिकाणी फ्रेंडली फाईट होणार असल्याचं स्पष्टपणं सांगितलंय.


उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत  4 नोव्हेंबरपर्यंत आहे. दरम्यानच्या काळात अजित पवार महायुतीतच्या नेत्यांशी चर्चा करुन अणुशक्तीनगर आणि मानखुर्दमधील शिवसेनेच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करतील का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.


 राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार भाजप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली. या अगोदरही देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका स्पष्ट केल्याचं शेलार यांनी सांगितलं.