Maharashtra Assembly Elections 2024 :  उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा भाचा असलेल्या वरूण सरदेसाई यांच्यासमोर बाबा सिद्धीकी यांचा मुलगा झिशान सिद्धीकी यांचं आव्हान असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. झीशान सिद्दीकी यांनी पक्ष प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना लगेचच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वची जागा लढवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता झिशान विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेनेचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे.


झीशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना लगेचच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्वची जागा लढवणार आहेत. त्यामुळे आता झिशान विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेनेचे  वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे.


पक्ष प्रवेशावेळी झिशान सिद्दिकी थोडसे भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांची उणीव कायम भासणार असल्याचं त्यांनी म्हटलंय
झिशान सिद्दिकींनी आपल्या वडिलांबाबत ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहिलीय. झिशान यांनी 5 वर्षापूर्वींचा एक फोटो शेअर केलाय. 25 ऑक्टोबर 2019 चा हा फोटो आहे. या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यावेळी झिशान सिद्दिकींचा वांद्रेतून विजय झाला होता. यावेळी झिशान यांनी बाबा सिद्दीकींची गळाभेट घेतली आणि या गळाभेटीचा फोटो झिशान यांनी ट्विटरवर शेअर केलाय.


वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे. 2019च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटल्याने काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. आता ठाकरेंच्या भाच्याला सिद्धीकीच्या मुलाचे चॅलेन्ज मिळणार आहे.