Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटापाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरु आहे. अशातच  शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल याची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे.  शरद पवार यांनी अका बड्या नेत्याचे नाव जाहीर केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी मोठं विधान केलंय.. जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान शरद पवार यांनी केलंय.. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगलीतल्या सांगता सभेत शरद पवार बोलत होते. उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगती घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे असं शरद पवारांनी सांगलीच्या सभेत जाहीर केलंय. त्यामुळे जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत का याची चर्चा आता सुरु झालीय.. 


सांगलीतल्या शिवस्वराज्य सांगता सभेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री अशी घोषणाबाजी केली.. मात्र त्यावरुन जयंत पाटील यांनीही मिश्किल टोलेबाजी केली.. घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही तर त्याला खूप उठाबशा काढाव्या लागतात असा टोला जयंत पाटील यांनी लगावला..


उठा उठा निवडणूक आली आता गद्दारांना गाडण्याची पवार वेळ आली असं आवाहन अमोल कोल्हेंनी शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत केलंय... त्याचसोबत मुख्यमंत्रिपदाबाबतही अमोल कोल्हेंनी सूचक विधान केलंय. वाळव्याचा माणूस वर्षावर जायची इच्छा आहे असं म्हणत अमोल कोल्हेंनी जयंत पाटील यांच्याबाबत सूचक विधान केलंय..