दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई :  राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon session 2021) येत्या 5 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्याआधी पावसाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेला चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळाचं कामकाज 5 आणि 6 जुलैला या 2  दिवस चालणार आहे. (Maharashtra Assembly Monsoon session 2021 Tea party canceled in the background of Corona)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यावर कोरोनाचा धोका कायम आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी असली तर अजूनही कोरोना नियंत्रणात आलेला नाही. त्यात डेटा व्हेरियंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. चहा पानाच्या कार्यक्रमाचं आयोजन नेहमीप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करण्यात येतं. या कार्यक्रमाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सर्वच उपस्थित असतात. अशा परिस्थितीत कोरोना नियमांना फाटा मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे खबरदारी म्हणून हा कार्यक्रम रद्द केला गेला आहे.
 
सह्याद्रीवर मंत्रीमंडळ बैठक


दरम्यान उद्या (4 जुलै) सह्याद्री शासकीय अतिथीगृहात संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान याआधी कोरोनाचा धोका लक्षात घेत पावसाळी अधिवेशन केवळ 2 दिवस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरुन विरोधी पक्षाकडून टीका करण्यात आली. 


संबंधित बातम्या :


मराठा आरक्षणासाठी संभाजी सेनेकडून रेलरोको, दिला हा इशारा


विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी?