Sadanand Date News: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या डायरेक्टर जनरल ( DG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पियूष आनंद यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF)च्या डायरेक्ट जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून बुधवारी 27 मार्च रोजी या नियुक्तांबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. आयपीएस राजीव कुमार शर्मा यांना ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPRD) मध्ये DG म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळं अनेकदा चर्चेत राहिले आहे. मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या हाती आता संपूर्ण NIAची सूत्रे असणार आहेत. दाते यांना 2015मध्ये सीआरपीएफच्या डीजीपदी नियुक्त करण्यात आले होते. हा तो काळ होता जेव्हा छत्तीसगढसह  देशातील अनेक भागांत नक्षलवादी कारवायांनी डोकं वर काढलं होतं. त्यानंतर सशस्त्र अभियान राबवण्यात आले होते. 


सदानंद दाते हे 1990 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगढच्या गडचिरोलीमध्ये नक्षली मोर्चाच्या काळातही तैनात होते. तर, फेब्रुवारीमध्ये सीआरपीएफमध्ये त्यांना आयजीपदी बढती मिळाली होती. त्यांना सीआरपीएफचे स्पेशल आयजी बनवले होते. त्यानंतर डीजी म्हणून ते सीआरपीएफमध्ये पाच वर्ष नियुक्त होते. आता त्यांच्या हाती एनआयएची धुरा सोपवण्यात आली आहे. 


26/11 चा हल्ला करिअरमधील सर्वात आव्हानात्मक केसः दाते


26 नोव्हेंबर 2008च्या रात्री मुंबई शहरावर 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला. मुंबईवर झालेल्या हा आजवरचा सर्वात भीषण हल्ला होता. आयपीएस सदानंद दाते यांनीही आपल्या जीवाची बाजी लावत दहशतवाद्यांना रोखण्याचे काम केले होते. हल्ला झाल्यानंतर व दहशतवाद्यांना टार्गेट केलेल्या जागेवर सर्वात पहिले दाते पोहोचले होते व शेवटपर्यंत हे या कारवाया रोखण्यासाठी झगडत होते. सीएसटीयेथील कामा आणि एल्बलेस रुग्णालयात ते दहशतवाद्यांशी लढत होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमीदेखील झाले होते. 


सदानंद दाते यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 26/11 हल्ला या माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील आव्हानात्मक घटना होती. आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहे. मी माझ्या क्षमतेनुसार जे काही सर्वोत्तम होतं ते करण्याचा प्रयत्न केला, असं दाते यांनी म्हटलं. 


सदानंद दाते यांना 26/11 हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या साहसामुळं त्यांचा सन्मानदेखील केला होता. दाते यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.