नाशिक : नाशिकमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे दौऱ्यावर आले होते. यावेळी राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांच्या बिलाबाबत मोठी घोषणा केली. कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणावर बिलं आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे हॉस्पिटलचं बिल ऑडिटरने चेक केल्यानंतरच रुग्णांना देणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या ऑडिटर्सना एक-एक हॉस्पिटल देण्यात येईल. हॉस्पिटलने दिलेलं बिल पहिले ऑडिटरकडे जाईल. ठरलेल्या दरानुसारच बिल देण्यात आलं आहे का नाही, हे ऑडिटर तपासेल, यानंतरच बिल रुग्णाला दिलं जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 


महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये ९७७ मोफत उपचार होत आहेत का, हे ऑडिटर बघेल. यानंतर ऑडिटरची सही पाहून हे बिल रुग्णाच्या नातेवाईकांना दिलं जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.