नागपूर : 1) राज्यव्यापी शेतकरी संप आणि बंद आंदोलनात चंद्रपूरकर काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. शहरातील गांधी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भाज्या फेकून आंदोलन केले. शहरातील मुख्य बाजारात एक रॅली काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद सफल करण्याचे आवाहन व्यापा-याना केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या जीन्स पॅन्ट वक्तव्याचा देखील आंदोलनात कार्यकर्त्यांनी निषेध केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2) वर्ध्यात नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जाम चौरस्त्यावर शेतकऱ्यांनी मानवीसाखळी आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी महामार्गावर दूध भाजीपाला टाकत आंदोलन केले. 


3) शेतकरी संपाचा फारसा परिणाम नागपुरात जाणवला नाही. नागपूरच्या कळमना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज धान्य, भाजी आणि फळांच्या पुरवठ्यासाठी सुमारे ६०० ट्रक येतात. फळांची आवक घटली आहे. मात्र आंब्याचा हंगाम संपत आल्याने आवक घटल्याचं सांगितलं जात आहे. भाज्यांच्या पुरवठ्यावर मात्र परिणाम झालेला नाही. नागपूरच्या घाऊक आणि पर्यायी असलेल्या महात्मा फुले बाजारातही संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. रोजच्या प्रमाणे इथेही सुमारे ९० ट्रकमधून भाजीपाला पुरवठा झाला.  


4) रामटेकमध्ये शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागलं. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्त्ये एकमेकांना भिडले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. भाजप नगरसेवक मानकर यांच्या दुकानातील साहित्याची शिवसैनिरांनी नासधूस केली. अखेर जमाव पांगवण्यासाठी रामटेक पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. रामटेकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.