मुंबई : महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद आता राज्यभरात बघायला मिळत आहेत. तसेच ते मुंबईच्या उपनगरातही दिसायला लागले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.


कल्याणमध्ये आंदोलक रस्त्यांवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमधेय रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प आहे. ठिकठिकाणी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्यात येत आहेत. सकाळ पासून शांतता असणाऱ्या कल्याण मध्ये दुपारी १२ वाजल्या पासून  तणावाची स्थिती निर्माण झाली. गटागटाने आंदोलक रस्त्यांवर उतरून बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. जबरदस्तीने शहरातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. आंदोलकांनी कल्याण नगर राष्ट्रीय महामार्ग आणि जुना आग्रा रोडवरची वाहतूक रोखून धरली. शहरातली रस्ते वाहतूक बंद करण्यात आली.


डोंबिवलीत तोडफोड


डोंबिवलीमध्ये सकाळी शांतता होती. मात्र, दुपारी १२ नंतर डोंबिवलीत कडकडीत बंद पाळला जात आहे. रेल्वे स्टेशच्या तिकीट काऊंटरच्या काचांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल्स, दुकाने पूर्णपणे बंद आहेत. तर बसेस आणि रिक्षाही दुपारनंतर बंद ठेवण्यात आल्या आहेत.