मुंबई : ED sent second summon to Bhawna Gawli : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhawna Gawli0 आजही ईडीसमोर (ED) हजर राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी हजर राहण्यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली आहे. चिकनगुनिया झाल्याने हजर राहत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. भावना गवळी यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. (ED second summon)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीकडून अनेक राजकीय नेत्यांची चौकशी करण्यात येत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, आजही ईडीसमोर त्या हजर राहणार नाहीत. चिकनगुनिया झाल्याने हजर राहत नसल्याचे त्यांनी कारण दिले आहे.


भावना गवळी यांनी आता हजर राहण्यासाठी 15 दिवसांची ईडीकडे मुदत मागितली आहे. याबाबत भावना गवळी यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे. आता ईडी काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, ईडी तिसरे समन्स त्यांना पाठवणार का की, त्यांना पंधरा दिवसांची मुदतवाढ देणार याकडे लक्ष लागले आहे.


भावना गवळी (Bhavana Gawali) सध्या ईडीच्या (ED) रडावर आहेत. ईडीने भावना गवळी यांना समन्स पाठवल्यानंतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण अर्धा तास त्या 'वर्षा' बंगल्यावर वाट बघत होत्या. त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट दिली नाही.



भावना गवळी महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीत परावर्तीत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सईद खान या कंपनी डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये गवळी या निर्देशक होत्या. त्यामुळे भावना गवळी यांचीही ईडीकडून ही चौकशी होणार आहे, असे सांगितले जात आहे.