Maharashtra Bhushan Award ceremony : आताची सर्वात मोठी बातमी.... संपूर्ण राज्याला हादरवणारी बातमी...'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहणं लागलंय. उष्माघाताचा त्रासामुळे (Heat stroke) 11 श्री सेवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ( Death due to heatstroke) आहे.  100 लोक उष्माघातामुळे बाधीत असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. बाकी सर्व मृतदेहांची ओळख पटलीय. अजूनही तीन जणांचा शोध लागलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) उपस्थित होते. नवी मुंबईमधील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर या दिमाखदार सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्री सेवक लाखोंच्या संख्येतून आले होते. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला जवळपास 20 लाख लोक उपस्थित होते. 


मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत 


उन्हात कार्यक्रम झाल्यानंतर अनेक सदस्यांना चक्कर येणे, उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांनी एमजीएम रूग्णालयात जाऊन दाखल असलेल्या श्री सदस्यांची विचारपूस केली. ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांच्या वारसांना सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केलीय. रुग्णालयात दाखल असलेल्यांवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार आहेत. झालेली ही दुख:द घटना आहे, मनाला वेदना देणारी घटना आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी घोषित केलं.


देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट 


श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. असं ट्टिट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


विरोधकांकडून सरकारवर टीका 


सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप 11 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे. 




विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात जाऊन अत्यवस्थ रूग्णांची भेट घेतली.


अमित शाहांना जायचं होतं म्हणून संध्याकाळचा कार्यक्रम दुपारी घेतला असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तर हलगर्जीपणामुळे काय घडू शकतं हे राज्याने पाहिलं असं अजित पवार म्हणाले. 



उष्णघाताचे 11 बळी


तुळशीराम भाऊ वागडे 58, जांभूळ विहीर ता. जव्हार


जयश्री जगन्नाथ पाटील 54, वारळ पो मोदडी ता. म्हसळा


महेश नारायण गायकर 42, मेदडू ता. म्हसळा


मंजुषा कृष्णा भोगडे, भुलेश्वर, मुंबई


भीमा कृष्णा साळवे 58, कळवा ठाणे


सविता संजय पवार 42, मंगळवेदा, सोलापूर


स्वप्नील सदाशिव किणी 32, विरार


पुष्पां मदन गायकर 63, कळवा ठाणे


वंदना जगन्नाथ पाटील 62, माडप ता. खालापूर


कलावती सिद्धराम वायचल, सोलापूर