Maharashtra Assembly Election: हरियाणासह जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. नुकतेच एक्झिट पोल जाहीर झालेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी हरियाणामध्ये काँग्रेसच्या विजयाचा दावा केलाय. मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निकालाचे परिणाम येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरही पडू शकतात. त्यामुळं हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रात टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पाहुयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणामध्ये भाजपच्या 10 वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरूंग लावू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. दुसरीकडे जम्मू काश्मिरमध्येही नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचू शकते, असं आकडे सांगतायत. एक्झिट पोलचे आकडे सत्यात उतरले तर भारतीय जनता पक्षाला लोकसभेपाठोपाठ दुसरा मोठा धक्का बसेल. 


तीन राज्यांवर परिणाम 


पण या दोन राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम येऊ घातलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या तीन राज्यांवरही पडणार आहे, त्यामुळे तर भाजपची चिंता आणखी वाढणार आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निकालानंतर केंद्रातलं सरकार बदलणार असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात केलं होतं. 


हरियाणा गेल्यास महाराष्ट्रसुद्धा भाजपच्या हातातून निसटण्याची शक्यता


महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुका तोंडावर असल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय. हरियाणासोबत जम्मू काश्मिरमध्ये भाजपला फटका बसल्यास त्याचे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही पडसाद उमटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे हरियाणा गेल्यास महाराष्ट्रसुद्धा भाजपच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल हरियाणाचा असला तरी टेन्शन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसतंय.