मुंबई : भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या (BJP 12 Mla) प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. या आमदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त कऱण्यात येत आहे. तर, भाजप नेत्यांच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. (maharashtra bjp state vice president chitra wagh says bjp is not a flower it is a fire)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्य सरकारवर थेट 'पुष्पा'स्टाईल टीका केली आहे. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? ये फ्लॉवर नहीं फायर है..! अशी टीका वाघ यांनी ट्विट करून केलीय.


महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय. कायदा- नियम पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले. पण, सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलंय. महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? ये फ्लॉवर नहीं, फायर है..! असं ट्विट चित्र वाघ यांनी केलंय.