Maharashtra Board HSC Exams 2024 : शालेय जीवनाची पायरी ओलांडल्यानंतर पुढे महाविद्यालयीन आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे इयत्ता बारावीचा. इथूनच पुढं पदवी शिक्षणासाठीची वाट निवडून करिअरचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठीचे प्रयत्न सुरु होतात. दरम्यान, विद्यार्थ्यांसमोर असणारी इयत्ता बारावीची परीक्षा आणि इतर काही प्रवेश परीक्षाही उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. याच इयत्ता बारावीच्या परीक्षांना बुधवार (21 फेब्रुवारी 2024) पासून सुरुवात होत आहे. राज्यातील 15,13,109 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 


परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष व्यवस्था 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कॉपी किंवा तत्सम कोणताही प्रकार परीक्षांदरम्यान घडणार नाही, यावर या पकांची करडी नजर असेल. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्या क्षणापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय प्रश्नपत्रिका वाहतुकीवेळी जीपीएस (GPS) प्रणालीचाही वापर केला जाणार आहे.


मे महिन्याच्या अखेरीस लागणार निकाल? 


यंदाच्या वर्षी अंतर्गत मूल्यमापन आणि Practicle चे गुण ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात येणार असून, अधिकाधिक काम ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार असल्यामुळं निकाल प्रक्रियेतील काम अधिक वेगानं होणार आहे. ज्यामुळं मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.


हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा


कसं आहे परीक्षेचं वेळापत्रक? 


21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यानच्या काळात बारावीची परीक्षा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी या परीक्षेत विज्ञान शाखेकडून यंदा विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजेत सात लाख 60 हजार 46 विद्यार्थी, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख 26 हजार 905, कला शाखेसाठी तीन लाख 81 हजार 982, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37 हजार 226 तर, आयटीआयसाठी चार हजार 750 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.