मुंबई : Maharashtra board Offline Exams : 2022 मधील दहावी-बारावीची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. तशी राज्य शिक्षण मंडळाकडून तयारी सुरु झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियोजन सुरू करण्यात येत आहे. लवकरच लेखी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. (Maharashtra board Offline Exams 2022 - Class 10, 12 written examination will be held offline, schedule will be announced soon)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 वी आणि 12वीची लेखी परीक्षा यंदा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जात आहे. लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्यासाठी नुकतीच शालेय शिक्षण विभागाने चाचपणी सुरु केली होती. 


गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने10 वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाला आहे.  त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.  त्यासाठी मंडळाने नऊ विभागीय मंडळांतून तयारीची माहितीही गोळा करण्यास सुरुवात केली आहे.