मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे संतापलेल्या नागरिकांना ऎन दिवाळीच्या तोंडावर दिलासा देण्यात आलाय. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना खुशखबर दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होतील. राज्यात पेट्रोल २ रुपये आणि डिझेल १ रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. 


देशभरात पेट्रोलचे दर भडकले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर जवळपास ८० रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे सरकारवर चौफेर टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी दोन रुपयांनी कमी करत मोठा दिलासा दिला.