Maharashtra Cabinet Expansion : दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड; वर्षावरील चर्चेत मोठा निर्णय
Devendra Fadnavis Meet Chief Minister Eknath Shinde : शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Cabinet expansion soon in Maharashtra : महाराष्ट्र राजकारण्यातील सर्वात मोठी बातमी...शिंदे आणि फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी...दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड होणार आहेत. दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवाली उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. (Maharashtra Cabinet Expansion After Diwali nmp)
एकनाथ शिंदेंनीही दिले होते संकेत
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या सरकारने गेल्या तीन महिन्यांत जनतेच्या हिताचे 72 मोठे निर्णय घेतले आहेत. विरोधकांच्या टीकेला ते प्रत्युत्तर देतील. त्याच वेळी ते म्हणाले होते की मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य वेळी होईल.
सध्या मंत्रिमंडळात किती मंत्री?
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 18 कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदे गटाचे आणि भाजप गटाचे प्रत्येकी नऊ मंत्री आहेत.
'या' दिवशी झाला होता मंत्रिमंडळ विस्तार
महाराष्ट्रातील शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट 2022 रोजी झालं होतं. आता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात 43 सदस्य असू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.