COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्यमंत्रीमंडळ फेरबदल हालचालींना वेग आलाय. लवकरच राज्यातील मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना आज दिल्लीला बोलावण्यात आलंय. आज रात्री किंवा उद्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन राज्यमंत्रीमंडळाच्या फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


जातीय, प्रादेशिक अशा वेगवेगळे अंग आहेत, याबाबत यादी निश्चित करण्यात आली आहे. शिवसेनेबाबतही यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रीमंडळ बदल म्हटल की नव्या चेहऱ्यांना संधी असं म्हटलं जात पण नेमकं काय होईल हे निश्चित नाही. तरी काही मंत्र्यांची खाती बदलली जातील आणि नव्या जागा भरल्या जातील असं म्हटलं जातंय. मंत्रिमंडळ बदल कसे असतील त्याचे राज्यावर परिणाम कसे होतील यावरही इथे चर्चा होणार आहे. 


नव्या लोकांना राज्यमंत्र्यांच्या जागी समाविष्ट करण्यात येईल. थोडक्यात हा मंत्रीमंडळ विस्तार नसेल तर खाते बदल असेल असं सांगितलं जातंय. उद्या सकाळपर्यंत मंत्रीमंडळ विस्ताराचं चित्र स्पष्ट होणार आहे.