सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांची टीका
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात, आणि तो पुतळा बसवण्यात जो काही हलगर्जी पणा झाला असेल, या सगळ्या कामात भ्रष्टाचार झाला आहे का याची चौकशी करण्यासााठी राज्य सरकारने समिती नेमली पाहीजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. अनथ्या आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे. 


'पुतळा पुन्हा उभारणं हे आमचं कर्तव्य'
ही अत्यंत दुर्देवी घटना आहे, तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुतळा लवकर उभा करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.