`एक तर तू राहशील, किंवा मी`, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, `संपवण्याची भाषा...`
Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर इशारा दिला आहे. `एक तर तू राहशील, किंवा मी राहीन` या शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी केलेल्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर इशारा दिला आहे. 'एक तर तू राहशील, किंवा मी राहीन' या शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी केलेल्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कोणी कोणाला कायमचं संपवण्याची भाषा करु नये. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी जे काम केलं ते पाहता फक्त मीच नाही तर महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले आहेत.
'महाविकास आघाडीचा विकासाला विरोध होता. आम्ही त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प सुरु केले. चारी बाजूला कामं सुरु आहेत. पंतप्रधान येऊन उद्घाटन करत आहेत. आम्ही लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, युवा प्रशिक्षण योजना सुरु केली. मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामुळे विरोधक गोंधळले आहते. त्यांच्या पोटात दुखत आहेत. लक्ष हटवण्यासाठी ही भाषा वापरली जात आहे," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
'एक तर तू राहशील किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा
"आम्ही जे काही काम करत आहोत, जे काही लोकांसाठी योजना आणत आहोत. राज्याचा विकास सुरु आहे. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याण सुरु आहे. या कल्याणकारी योजना त्यांच्यासाठी पोटदुखी झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते बिथरले आहेत. मानसिक गोंधळ झालेला असतो तेव्हा माणूस असं भाष्य करतो. महाविकास आघाडी गोंधळलेल्या अवस्थेत आहे," असा टोला त्यांनी लगावला आहे.
असा नडलो की मोदींना घाम फोडला; शाखाप्रमुख बैठकीत उद्धव ठाकरे कडाडले, 'वाकडे गेलात तर...'
"एखाद्याला आव्हान देताना मैदानात उतरावं लागतं. घऱात बसून कोणी आव्हान देत नाही. त्याने काही फरक पडत नाही. घऱी बसणाऱ्यांना, फेसबुक लाईव्ह कऱणाऱ्यांना असं राज्य चालत नाही हे सांगायचं आहे. मी, फडणवीस फिल्डवर काम कऱणारे आहोत," असंही ते म्हणाले.
"राजकारणात कोणी कोणाला कायमचं संपवण्याची भाषा करु नये. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी जे काम केलं ते पाहता महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. आव्हानाची भाषा करताना मनगटात ताकद असावी लागते, जोर असावा लागतो. फुकाच्या बाता मारुन कोणी कोणाला संपवू शकत नाही," असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
"तुम्ही आरोप करत राहा, आम्ही विकासाने उत्तर देऊ. आज राज्यभरात विकासाचे प्रकल्प सुरु आहेत. राज्यात कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यांची आम्ही प्रभावीपणे अंमलबजावणी करु. राज्यात गेल्या 2 वर्षात झालेला विकास आणि 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं काम यातील तुलना करा," असं आवाहनही त्यांनी केलं.