राधाकृष्ण विखे-पाटील कोरोना बाधित, अधिवेशनाला लावली होती उपस्थिती
एका लग्नसोहळ्यातही भाजप नेत्यांबरोबर विखे-पाटील होते उपस्थित
radhakrishna vikhe patil corona positive : राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता राज्यातील काही बड्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती.
आज भाजपच्या आणखी दोन नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. भाजपचे नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे (Radha Krishna Vikhe Patil Corona Positive). त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळा अधिवेशनाला (Winter Session Assembly) राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. तर काल आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नालाही त्यांनी उपस्थिती लावली होती.
विखे-पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ट्विट करुन आवाहन केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे.
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.<br>माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
विशेष म्हणजे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, सुजय विख पाटील, खासदार गिरीष महाजन, भाजप नेते राम शिंदे या नेत्यांनी हजेरी लावली होती.