मुंबई : महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाखाच्या वर गेला आहे. राज्यातली कोरोनाग्रस्तांची एकूण आकडेवारी १,०१,१४१ एवढी आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे ३,७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाखांच्या पुढे गेला असला तरी सध्या ४९,६१६ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर ४७,७९६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे ३,४९३ नवे रुग्ण वाढले आहेत, तर १२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात १,७१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत १३६६ रूग्ण वाढले असून ९० जणांचा मृत्यू झाला आहे.


एकट्या मुंबईमध्ये राज्यातल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या ५५,४५१ एवढी आहे. यातले ऍक्टिव्ह रुग्ण २८,२४८ एवढे आहेत, तर २५,१५२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमध्ये कोरोनामुळे २,०४४ जणांचा मृत्यू झाला आहे. 


मुंबईतल्या धारावीमध्ये रुग्णसंख्येने २ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज धारावीमध्ये २९ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या २,०१३ एवढी झाली आहे. धारावीत आज २ जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ७७ एवढी झाली आहे. दादरमध्ये १५ रूग्ण वाढल्यामुळे रूग्णसंख्या ४८६ तर माहिममध्ये १६ रूग्ण वाढल्याने एकूण रूग्णसंख्या ७३० एवढी झाली आहे.