`गणेश विसर्जनावर दगडफेक...`, केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले `हिंदुत्वासाठी तडफेने...`
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCp) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी याला दुजोरा दिला आहे. अजितदादांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसंच महायुतीलीमधील घटकपक्षांनी आपली नाराजी जाहीर केली हे स्पष्ट आहे. भाजपाच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाकडे नाराजी जाहीर केली आहे. अशी बेताल वक्तव्यं करणं योग्य नाही असं सांगण्यात आलं आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
प्रत्येकाला आपली मतं, विचार मांडण्याचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार दिला आहे. पण सत्ताधारी, विरोधातील कोणीही असो, वाचाळवीरांनी मर्यादा पाळायला हव्यात. आपण शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहत आहोत. वेडीवाकडं विधानं करुन मुख्यमंत्री, महायुती सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये अशा शब्दांत अजित पवारांनी जाहीर सभेतून खडसावलं आहे.
यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. "अजित पवारांना कुठे करायची तिथे तक्रार करु शकतात. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. वरिष्ठांशी बोलल्यानंतर त्यांनी काही सांगितलं तर आम्ही त्या पद्घतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमची दिल्लीत तक्रार करणाऱ्यांनी गणेश चतुर्थीत विसर्जनावर दगडफेक करणाऱ्यांबद्दलही निषेध व्यक्त करायला हवा होता. ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा तक्रार करावी लागणार नाही अशी वेळ य़ेईल," असं नितेश राणे म्हणाले आहेत.
'नितेश राणेंशी माझी आणि नारायण राणेंची चर्चा'
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला तक्रारीबद्दल माहिती नाही सांगताना मी आणि स्वत: नारायण राणेंनीही नितेश राणेंशी चर्चा केली असल्याची माहिती दिली. "अजित पवारांनी कोणाकडे तक्रार केली किंवा अशी तक्रार केलीये का हे मला माहिती नाही. पण नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत. ते अतिशय तडफेने हिंदुत्वाचे प्रश्न मांडतात. अर्थात हे विषय मांडताना ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थही निघतात. यासंदर्भात मी आणि स्वत: नारायण राणेंनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे ते त्याची काळजी नक्की घेतील," असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.