सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राष्ट्रवादीने 'जनावरांचा मोर्चा' काढला. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटकात दावणीला चारा दिला जातोय मात्र महाराष्ट्रात ना चारा ना चारा छावण्या अशी स्थिती आहे. भाजपा सरकार हे दुष्काळाकडेसुद्धा पक्षीय दृष्टिकोनातून बघतय. भाजपाला पाठींबा दिलेल्या लोकांनाच फक्त चारा पाणी दिला जातोय हे चुकीचे आहे. अशी गंभीर टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्झिट पोल म्हणजे निवडणूक निकाल नव्हे, आम्ही ग्राऊंडवर गेलो होतो. जनतेच्या मनात काय आहे. हे आम्ही अनुभवलं आहे. महाराष्ट्रात 23 पेक्षा आमच्या जगा कमी येणार नाहीत. पण तसं झालं तर 'दाल मे कूछ काला है' अस लोक म्हणतील. प्रत्येक मशीन मधून व्ही व्ही पॅडच्या स्लिप मोजाव्यात असंही जयंत पाटील यांनी सांगितले.



मोदी लाट ओसरली त्यांच्या सभा ओस पडत होत्या. जनतेत भाजपा विरोधी रोष होता. तरी एक्झिट पोल प्रमाणे आकडे येणार असतील तर हे मॅनेज आहे असं लोकांना नक्की वाटेल असंही जयंत पाटील म्हणाले.