योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी 300 कोटींचं ड्रग्ज (Drugs) जप्त करून 24 तासही उलटत नाही तोच त्याच शिंदे गावात ड्रग्जच्या कच्च्या मालाचा कारखाना (Drugs Factory) उद्ध्वस्त करण्यात आला. नाशिक रोड पोलिसांच्या (Nashik Road Police) शोध पथकानं ही धडक कारवाई केली. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारं ड्रग्ज नाशिक रोडच्या शिंदे गावातून पुरवलं तर जात नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय. या कारवाईमुळं नाशिकमध्ये ड्रगचं मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. अजूनही नाशिकच्या विविध भागांत कोट्यवधी रुपयांचा ड़्रग्जसाठा असल्याचा संशय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नाशिक गाठलं. त्यावेळी इथल्या शिंदे गावात ड्रग्जची फॅक्ट्रीच सापडली. या फॅक्ट्रीत चक्क एमडी ड्रग्जची (MD Drugs) निर्मिती केली जात होती. पोलिसांनी तब्बल 300 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करत 12 जणांना अटक केली. तर दुसऱ्या दिवशी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शिंदे गावापासून हाकेच्या अंतरावरील रहिवासी वस्तीत धाड टाकली. तेव्हा तिथं ड्रग्जसाठी लागणाऱ्या विविध रसायनांचा मोठा साठा आढळून आला. 


पोलिसांच्या या कारवाईनंतर आता अनेक सवाल उपस्थित होतायेत. नाशिकमध्ये एव्हढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त होत असेल तर राज्यभर पसरलेल्या ड्रग्जच्या कारभाराचं उगमस्थान नाशिकच आहे का? पुणे पोलिसांच्या हातून पसार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ नाशिकमध्ये ड्रग्जची निर्मिती करत होता. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय टोळीही सक्रिया असल्याचा संशय व्यक्त होतोय. 


मंदिरांची नगरी ही नाशिकची खरी ओळख, मात्र गेल्या दोन दिवसांत मुंबई आणि नाशिक पोलिसांनी याच नाशिकमधून कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंदिरांची नगरी आत नशेची नगरी बनू लागलीय की काय? असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे.


ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार
पुण्यातील ड्रग रॅकेटचा (Drug racket) सूत्रधार असलेला ललित पाटील (Lalit Patil) ससून रुग्णालयातून पळून गेला. येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर गेल्या 3 जूनपासून ससूननमध्ये (Sassoon hospital) उपचार सुरू होते. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर,त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.