BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपचा जाहीरनामा सादर केला आहे. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात 25 आश्वासने दिली आहेत. यात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांचा दरमहा निधी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन, 25 लाख रोजगार आणि सरकारी नोकरी यांचा समावेश आहे. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात काय म्हटलंय, जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरून रु. २१०० देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरत निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले आईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल


2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. 12,000 वरून रु. 15,000, तसेच एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत योजना राबविण्यात येईन.


3. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.


4. वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला रु. १७०० वरुन रु. २१०० देण्यात येतील. जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल.


5. महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील


6. येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख रु१०,००० विद्यावेतन देण्यात येईल.


7. राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधण्यात येतील


8. अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु१५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.


9. वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल 


10. सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत 'व्हिजन महाराष्ट्र २०२४ सादर करण्यात येईन.


11. सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राला ९१ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचं लक्ष्य ठेवले आहे. 22. 12.


12. महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नावीन्यपूर्ण (innovation) संकल्पना राबवण्यात येतील


13. 'मेक इन महाराष्ट्र' धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख इत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल.


14. महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बनवण्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणार वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल. सोबतच AI संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल.


15. नागपुर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल. 
16. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमांद्वारे पुढीलप्रमाणे प्रयत्न करण्यात येईल


- शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या सातांवरील संपूर्ण राजा बस्तु सेवा कर (GST)


-अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देऊ


-उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्शनासाठी समर्पित संपूर्ण श्रृंखलेची स्थापना करू.


17. सन २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करण्यात देतील यासाठी, प्रत्येक ५०० स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक कनस्टर तयार करण्यात येईल आणि ११,००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येईल.


18. अक्षय अन्न योजना' अंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबाना दरमहा मोफत शिधा पुरविण्यात येतील, यामध्ये तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तन, मीठ, साखर, हळद, गौहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असेल.


19. 'महारथी (महाराष्ट्र एडवांस रोबोटिक्स अँड ट्रेनिंग हम इनिशिएटिव्ह)- अटल टिंकरिंग लेंग्स योजना सुरू करण्यात येईल, ज्यामधून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील,


20. महाराष्ट्रात कौशल्य जनगणना (Skill Census) करण्यात येईल 


21. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र' स्थापन करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून १० लाख नवीन आयोजक तयार केले जातील, या केंद्रांमध्ये को चकिंग स्पेस आणि इनक्युबेशन सुविधांचा समावेश असेल


22. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ११५ लाख पर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येईल


23. ओबीसी, एसईबीसी, ईडबल्यूएस, एनटी. व्हीजेएनटीमधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल.


24. 18 ते 35 वयोगटातील तरुणांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद युवा आरोग्य कार्ड (Youth Health Card) सुरू करण्यात येईल तसेच नशामुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू करण्यात येईन. 


25. महाराष्ट्रात प्राचीन आणि ऐतिहासिक गड किल्यांची मोती संख्या आहे. हे गड किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक जडणघडणी मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारश्याचे जतन व संवर्धन यासाठी गड-किल्ले विकास प्राधिकरण स्थापित करणार 


26. 'ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य' धोरण स्वीकारण्यात येईत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी स्वयंचलित सेवा मिळवण्यासाठी आधा सक्षम सेवा वितरण (AESO) लागू करणे


27 बळजबरी आणि फसवणून करणाऱ्या धर्मातरापासून संरक्षण मिळेल.


28. वनालगत, शेतीमध्ये, मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या, हात्ती, गेंडा, रानडुक्कर आणि माकड वा वन्यप्राण्यांमुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यामराठी तसेच मानव- वन्यजीव संघर्ष कर्मी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान आणि रेडिओ कॉलर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येईल.