मुंबई : वीज कर्मचाऱ्यांसाठी (Electricity Employees) बोनस (Diwali Bonus) जाहीर करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात आणि ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात ऊर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन ऊर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर वीज कर्मचाऱ्यांचा संप होणार नाही त्यामुळे वीज ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान बोनसची रक्कम ही गेल्या वर्षी इतकीच असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस मिळाणार आहे. 



वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा तत्वतः निर्णय मी घेतला असून रकमेची घोषणा आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये करण्यात येईल. सर्व संघटनांनी आपला संप रद्द करून वीज ग्राहकांना त्रास होईल, असे कृत्य करू नये असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले होते.


दरम्यान, महावितरणमधील ७५०० पदांवरील नियुक्ती पत्र जारी करण्याचे आदेश मी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत. उपकेंद्र सहाय्यक, पदवीधर आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता, ज्युनियर इंजिनिअर, आदी पदांवरील नियुक्तीचे आदेश लगेच जारी होतील, अशी माहितीही ट्विटद्वारे ऊर्जा मंत्री राऊत यांनी दिली आहे.