Maharashtra : मुंबईच्या मालाडमध्ये ऑनलाईन आईस्क्रिम (Ice Cream) मागवल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला.  मालाडमधील एका डॉक्टरनं ऑनलाईन डिलिव्हरी अॅपमधून घरी आईस्क्रिम मागवलं. मात्र आईस्क्रिम खाताना त्यांना धक्काच बसला. कारण या आईस्क्रिममध्ये चक्क 2 इंच लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. या प्रकरणी मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय.  आईस्क्रिममध्ये सापडलेला तो बोटाचा तुकडा पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलाय.  आईस्क्रिम तयार करणाऱ्या कंपनीचीही कसून पोलीस चौकशी केली जाणाराय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते बोट कुणाचे?
आता आईसक्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कुणाचे? आहे याच्या तपासाला आता वेग आलाय. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलीय. फॉरेन्सिकच्या माध्यमातून याचा तपास केला जातोय. आता पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.


कॉफीच्या ग्लासमध्ये प्लास्टिकचे तुकडे
दुसरीकडे, अमरावतीतील एका हॉटेल मध्ये कॉफी (Coffee) पितांना ग्राहकांच्या ग्लास मध्ये प्लास्टीकचे लहान मोठे तुकडे आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या युवकांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या विषयी हॉटेल मधील कर्मचाऱ्यांना विचारलं असता हा संपूर्ण प्रकार चुकून झाल्याची कबुली देण्यात आली आहे.  सुमेध इंगळे व अभिजित वानखडे हे दोन युवक शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या एनसीसी कॅन्टीन समोरील एका हॉटेल मध्ये गेले. यावेळी त्यांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. काही वेळाने ऑर्डर केल्या प्रमाणे कॉफीची ग्लास देण्यात आले. यावेळी कॉफी पित असतांना या दोन्ही युवकांना ग्लासात काचेचे तुकडे आढळुन आले. त्यामुळे ती कॉफी अर्धवट सोडून त्यांनी हॉटेल संचालकांना विचारणा केली. हा गंभीर प्रकार असून वेळेवर हा प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.


दुधात भेसळ
अमरावतीत दूध विक्रेत्यांचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. दुधात (Milk) चक्क गुरांच्या पानवठ्यामधल्य़ा पाण्याची भेसळ करत असल्याचं समोर आलंय. झी 24 तासच्या हाती याबाबतचा एक्सलुझीव्ह व्हिडिओ हाती लागलाय.. अमरावतीच्या MIDC परिसरात हा धक्कादायक प्रकार घडालय. अमरावतीच्या MIDC परिसरात गुरांनासाठी पाणी पिण्यासाठी एक पाणवठा बांधला आहे त्या पणावठ्यात गुरांसाठी पाणी भरून ठेवले होते तेच दूषित पाणी चक्क दूध विक्रेते दुधात मिक्स करून अमरावती शहरात दूध विक्रीला घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरांचे पिण्याचे पाणी दुधात मिक्स केल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे तर लहान बालकांसोबत अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 


अमरावतीच्या MIDC परिसरातील संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.