Weather Update : देशभरात हवामानात लक्षणीय बदल होत असतानाच आता बहुतांश भागांमध्ये उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. (Maharashtra weather update) महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात झालेली असताना आता याचे परिणाम शेजारी राज्यांवरही दिसू लागले आहेत. कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याचा इशारा दिलेला असतानाच इथं काही भागांत तापमानाच लक्षणीय वाढ होईल असंही हवामान विभागानं सांगत नागरिकांना सतर्क केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नव्हे, आता शेजारील गोवा राज्याला अनुसरून आयएमडीनं अतीव महतत्वाचा आणि चिंतेत टाकणारा इशारा दिला आहे. (Goa heat wave) IMD च्या म्हणण्यानुसार गोव्यात उष्णतेची तीव्र लाट येणार असून, तापमान 37 अंश आणि त्यापेक्षाही जास्तीच्या आकड्यावर पोहोचू शकतो. तापमानात झालेली ही वाढ, नजीकचा समुद्र आणि त्यामुळं वाहणारे उष्ण वारे ही एकंदर परिस्थिती वाहता गोव्यातील नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी काही उपाय योजण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. 


उष्मघातापासून वाचण्यासाठी काय करावं? 


वाढत्या तापमानाविषयी सतर्क करण्यासोबतच आयएमडीनं गोव्यातील नागरिकांना शरीरातील पाण्याची पातळी संतुलिक ठेवण्याचंही आवाहन केलं आहे. यासाठी पुरेसं पाणी पिणं, लिंबू सरबत किंवा तत्सम पाण्याचा अधिक अंश असणाऱ्या पदार्थांचं सेवन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 
लहान मुलं आणि घरातील वृद्धांची यावेळी विशेष काळजी घ्या असं सांगत पुरेसा आहार करण्याचा सल्लाही सध्या देण्यात आला आहे. 


गरज नसल्यास घराबाहेर पडू नका 


गोव्यात तापमानाचा उच्चांक पाहता दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. शिवाय या काळात वणवा पेटू शकतो, त्या दृष्टीनंही राज्य शासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता गोवा शासनानं 9 तारखेपासून 10 मार्चपर्यंत दुपारी 12 ते 4 या कालावधीत शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


हेसुद्धा वाचा : 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दणदणीत Gift; खात्यात येणार हजारो रुपये 


आयएमडीच्या निरीक्षणानुसार मुंबईत पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि उर्वरित कोकण पट्ट्यातही तापमानाचा आकडा वाढलेला असेल त्यामुळं नागिरकांनीही काळजी घेणं अपेक्षित आहे. सध्याचा काळ सुट्ट्यांचा असल्यामुळं या भागांमध्ये जाऊ पाहणाऱ्यांनीही हवमानाचा अंदाज गांभीर्यानं घ्यावा हे महत्त्वाचं.