NCP Cabinet: ज्या क्षणाची गेल्या एक महिन्यापासून वाट पाहिली जात होती तो क्षण अखेर आलाय. महाराष्ट्र सरकारचे खातेवाटप कधी होणार? कोणाच्या वाट्याला कोणती खाती येणार? यावरुन राजकीय खलबत सुरु होती. सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चांवर चर्चा आणि विरोधकांकडून टोलेबाजी सुरु होती. अखेर राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यात अजित पवार यांना अर्थ खाते स्वत:कडे ठेवण्यास यश मिळालय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाकडे कोणती खाती असतील? जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस  यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर 5 फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. पण त्यानंतर सर्वांना अपेक्षा असलेलं खातेवाटप मात्र लांबत चाललं होतं. हिवाळी अधिवेशनाच्या आधी तरी खातेवाटप होईल अशी आशा होती. मात्र खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतीने खातेवाटप जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.  


राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालेली खाती ( कॅबिनेट) पुढीलप्रमाणे 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण तर  अदिती तटकरे यांच्याकडे  महिला व बालकल्याण खाते देण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा खाते, बाबासाहेब पाटील यांना सहकार्य खाते देण्यात आले आहे तर  मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वस खाते देण्यात आले आहे. दत्ता मामा भरणे यांना क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक  माणिकराव कोकाटे यांना कृषी खाते तर नरहरी झिरवाळ यांना अन्न व प्रशासन खाते देण्यात आले आहे. 


शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते राष्ट्रवादीकडे आले आहे. अजितदादांनी स्वत:कडे ठेवले आहे. सार्वजनिक बांधकाम भाजपकडून सेनेकडे गेले आहे तर राष्ट्रवादीचे बंदरे खाते भाजपला गेले आहे.शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेली खाती पुन्हा त्यांना देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असलेली दोन खाती अल्पसंख्याक आणि उत्पादन शुल्क राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत.