Maharashtra government Big fine : सुप्रीम कोर्टानेही राज्य सरकारला मोठा झटका दिला. रस्ता कंत्राटदाराला 5 कोटी रुपयांच्या भरपाईवर 300 कोटी रुपयांचे व्याज देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. (Maharashtra News in Marathi) न्यायालयीन लढाईत राज्य सरकारला मोठा भुर्दंड बसला आहे. या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.


जाम ते चंद्रपूरमधील वरोरा रस्त्यावर साखळी पुलांचे काम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा', या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील जाम ते चंद्रपूरमधील वरोरा रस्त्यावर साखळी पुलांचे काम खरे ॲण्ड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ऑक्टोबर 1997 मध्ये दिले. 226 कोटींचे हे काम कंपनीने ऑक्टोबर 1998 मध्ये पूर्ण केले. प्रकल्प कालावधी पूर्ण झाल्याने इथली टोल वसूली बंद करुन रस्ता आणि पूल सार्वजनिक विभागाकडे हस्तांतरित केला. त्यानंतर कंत्राटदाराने लवादाची मागणी केली. 


सुप्रीम कोर्टाने खालील कोर्टाचे आदेश ठेवला कायम


सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर. एच. तडवी यांची एकल लवाद म्हणून नेमले. लवादाने मार्च 2004 रोजी 5 कोटी 71 लाख हे 25 टक्के व्याजासह कंत्राटदाराला देण्याचे आदेश दिले. याविरोधात राज्य सरकार न्यायालयात गेले. परंतु सुप्रीम कोर्टानेही खालील कोर्टाचे आदेश कायम ठेवत राज्य सरकारला दणका दिला. सर्व स्तरावर शासनाची याचिका फेटाळल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने संबंधित कंपनीला व्याजासह रुपये अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्य सरकारला सुप्रीम कोर्टातही दणका मिळाल्यानंतर सरकारने ही रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व स्तरावर शासनाची याचिका फेटाळल्यानंतर अखेर 13 डिसेंबर 2022  रोजी राज्य मंत्रिमंडळाने कंत्राटदार खरे ॲण्ड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला व्याजासह 300 कोटी 3 लाख 62 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


 चक्रवाढ व्याजाने 5 कोटींवर 300 कोटी रुपये !


5 कोटी 71 लाख आणि त्यावर 25 टक्के प्रति महिना चक्रवाढ व्याजासह कंत्राटदाराला देण्याचे आदेश दिले. याविरोधात शासनातर्फे जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केले. लवादाचा आदेश कायम ठेवत व्याजाची टक्केवारी 25 वरुन 18 करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले. याविरोधात हायकोर्टात अपील करण्यात आले. हायकोर्टाने लवादाचा निर्णय कायम ठेवला. नंतर सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली. त्यावर 1 डिसेंबर 2021 रोजी सुनावणी होऊन हायकोर्टाचा आदेश कायम ठेवण्यात आला.