सरकार बिथरलय; त्यामुळे विधानसभेआधी प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 नव्हे तर `इतके` रुपये देतील- सुप्रिया सुळे
Supriya Sule On Ladki Bahin Yojna: यांच्याजवळ स्वतः केलेलं असं काही नाही.त्यामुळे अशा काही निर्णयाने मला बिलकुल आश्चर्य वाटत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Supriya Sule On Ladki Bahin Yojna: लोकसभेनंतर आता विधानसभेपर्यंत हे सरकार काय काय सांगेल याचा काही भरोसा नाही. आता हे सरकार घाबरलं. त्यामुळे निवडणुका देखील आता हे पुढे ढकलत आहे. त्यांना त्यांचं अपयश दिसत असल्याने सरकार बिथरलंय. त्यामुळे काहीही करुन महिलांना निवडणुकीआधाी 10 हजार रुपये सरकार देईल,असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला.महिला पोट तिडकिने महागाई आणि बेरोजगारीवर बोलतायत, शेतीचे प्रश्न मांडत आहेत.हे शेतकरी विरोधी सरकार आहे याला घालवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही.महाराष्ट्राची निवडणूक घ्याल्याला हे सरकार घाबरत आहे त्यामुळे यांनी निवडणूक पुढे ढकलली आहे. यांच्याजवळ स्वतः केलेलं असं काही नाही.त्यामुळे अशा काही निर्णयाने मला बिलकुल आश्चर्य वाटत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अमळनेर येथील सभेत त्यांनी नागिरकांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
निवडणुकीआधी 10 हजार रुपये देतील
काहीही करून प्रत्येक महिलेला निवडणूक होईपर्यंत 10 हजार रुपये या सरकारला द्यायचे आहेत.असं माझ्या कानावर आलेलं आहे. दहा ते पंधरा हजार रुपये अकाउंटवर जमा करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. स्वाभिमानी महाराष्ट्राची माणसांना हे कळणार नाही, असं 50 खोके एकदम ओके असणाऱ्या सरकारला असं वाटतंय, असेही त्या म्हणाल्या.
सरकारच्या विरोधात उपोषणाला बसणार
आशा वर्कर्स वाढीव अनुदान मिळेल असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलाय मात्र त्यावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही.आशा सेविकांचा जो निधी तुम्ही मंजूर केलेला आहे तर तात्काळ त्यांना द्यावा,अशी विनंती आपण करणार असल्याचे त्या म्हणाल्या. आशा सेविकांचे जाहीर केलेले पैसे सरकारने दिले नसतील तर पुढच्या आठवड्यापासून मी या सरकारच्या विरोधात मी उपोषण करेल, असेही त्या म्हणाल्या.
मेसेज आले पण पैसे मिळत नाही
प्रसिद्धी आणि कार्यक्रम करण्याच्या मागे धावण्यापेक्षा महिलांना खरंच मदत करायची असेल तर मंत्रालयातून हे स्ट्रीमलाईन केलं पाहिजे अशी माझी सरकारला विनंती असल्याचे त्या म्हणाल्या. काही महिलांना लाडकी बहिण योजनेचे अर्ज स्वीकारले गेल्याचे मेसेज आले पण अकाऊंटला पैसे आले नव्हते, यावर त्या बोलत होत्या.
गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया घ्या
संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुणीतरी राज्याच्या गृहमंत्र्यांना दाखवला पाहिजे आणि त्यांची यावर प्रतिक्रिया घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
फुटीमागे अदृश्य शक्ती
सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी फुटीमागे दिल्लीतील अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केलाय.. दिल्लीतील अदृश्य शक्तीनं राष्ट्रवादी फोडली आमचं घरं उद्ध्वस्त केलं. चिन्हही हिरावून घेतल्याचा आरोप अमळनेरमधील सभेतून सुळेंनी केलाय.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारला असता महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शपथविधी होईल तेव्हा तुम्हा सर्वांना बोलू तेव्हा तुम्हाला कळेल असे मिश्किल उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.