नाशिक : राज्य सरकारची शिष्टाई सफल झाली आहे. मुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. किसान मोर्चाला नाशिकमध्येच थोपवण्यात सरकारला यश आले आहे. किसान सभेच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याने तूर्तास किसान मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय झाला. सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई केली. वन जमिनीचे दावे ३ महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शेतकरी आणि मजुरांच्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यामुळे किसान सभेचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच केली होती. सकाळी नऊ वाजता नाशिकमधून या मोर्चाला सुरुवात झाली. हजारो शेतकरी आणि आदिवासी यांनी मुंबईकडे कूच केली होती. नाशिकमध्ये किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि पालकमंत्री गिरीश महाजनांची बैठक निष्फळ ठरली. कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू न शकल्याने किसान सभा मोर्चा पुढे निघाला. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लेखी हमीपत्र देणार नाही तोपर्यंत लाँग मार्च सुरूच राहणार असल्याचे जेपी गावित यांनी म्हटले होते. नाशिकच्या गोदाकाठावरून घोंगावणारे लाल वादळ मुंबई दिशेने निघाले होते.


किसान मोर्चा का झाला स्थगित ?


- किसान मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय
- गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश
- किसान मोर्चा नाशिकमध्येच थोपवण्यात सरकारला यश
- दोन महिन्यात आढावा बैठक घेणार
- 'नदीजोड प्रकल्पातील पाणी गुजरातला जाणार नाही'
- गिरीश महाजन यांचं किसान मोर्चाला आश्वासन
- 'वनजमिनीचे दावे ३ महिन्यात निकाली निघणार'
- देवस्थान जमिनी कसणाऱ्याच्या नावावर?
- किसान सभेच्या प्रमुख मागण्या मान्य
- मागण्या मान्य झाल्याने तूर्तास किसान मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय