ग्रामपंचायत निवडणूक निकाल : पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोण बाजी मारणार?
Maharashtra Gram Panchayat Election Results: पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्सुकता आहे.
मुंबई / पुणे / नाशिक : Maharashtra Gram Panchayat Election Results: पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्सुकता आहे. राज्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. तर 33 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, राज्यात सत्ताबदलानंतर प्रथमच हा निवडणूक निकाल आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून ग्रामपंचयतीच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्यानंतर राज्यात 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी काल मतदान झाले. आज ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 78 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर विदर्भातील बुलडाण्यात निवडणूक झाली. आता या सर्व ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत.