Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : राज्यात उद्या तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34  जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीचा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे गटाचा पाठिंबा वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटाला जास्त जागा मिळतात की ठाकरे गटाचा झेंडा सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  लागतो हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट सरपंचाची निवड ही सुद्धा जनतेतून होणार आहे. अनेक दिगज्यांची प्रतिष्ठापना लागणार आहे.